महाड तालुक्यातील किल्ले रायगड येथे जाणाऱ्या रोपवेची सेवा वार्षिक तांत्रिक देखभाल व दुरुस्तीमुळे २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. रोपवे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत रोपवे सेवा बंद राहणार आहे . मात्र १ मार्चपासून रोपवे सेवा पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याचे रोपवे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.