रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा आता अधिक चर्चेत आला आहे.या परिसरात झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.साई डोंगर परिसरातील वृक्षतोड आणि प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी झाडे लावण्याचे कामही केले.