रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील खोपोली-पेण भागात पावसाने महामार्ग पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी भरल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.सध्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असून अनेक गाड्या गेल्या 10 ते 12 तासांपासून अडकून पडल्या आहेत.