रायगडमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे, त्यामुळे उष्माघातावर मात करण्यासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाने विशेष तयारी केली आहे. उष्माघात कक्ष 24x7 कार्यरत असून डॉक्टर-परिचारिकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांत आईस पॅक, ORS आणि कोल्ड बॉक्सेसची उपलब्धता वाढवली आहे.