अलिबाग तालुक्यातल्या कामार्ली गावातील स्वाती नागावकर या महिला शेतकरी आता ‘ड्रोन पायलट’ बनल्या आहेत. आरएसआरएफ कंपनीच्या प्रशिक्षणातून त्यांनी ड्रोन उडवण्याचं कौशल्य आत्मसात केलं. गेल्या वर्षभरात त्यांनी 70 पेक्षा अधिक शेतांवर खतांची फवारणी केली आहे. अचूक आणि वेळेत फवारणी केल्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत आणि ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.