हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ८-१० तास उशिराने धावत आहेत, तर काही २-३ तास. यामुळे प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचता येत नसून, त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांकडून रेल्वे वेळापत्रक सुधारण्याची मागणी केली जात आहे.