बीड, केज आणि पाटोदा तालुक्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांचं नुकसान झालं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रात्रीपर्यंत आणखी पाऊस पडल्यास अनेक शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान होण्याची भीती आहे.