लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला असून या पावसाने आंबा, गहू, ज्वारी,हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. लातूर, निलंगा, औसा, चाकुर,रेणापूर, देवणी ,उदगीर ,अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला आहे.