अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती.त्यामुळे शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आली होती..मात्र,आज सकाळपासून अकोला शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.अखेर आज पावसाने हजेरी लावल्याने सुकत चाललेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसून येत आहे.