मागील ४८ तासांत भंडारा जिल्ह्यात झालेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि ॲक्शन मोडवर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा व पुजारीटोला धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे.