करमाळा तालुक्यात पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या; मात्र आता पावसाअभावी कोवळी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत व त्यांची वाढ खुंटली आहे.