नंदुरबार जिल्ह्यात अखेर पेरणीयोग्य पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून समाधानकारक पावसाअभावी रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता वेग येणार असून, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उर्वरित 40 टक्के, म्हणजेच सुमारे 1 लाख 7 हजार हेक्टर क्षेत्रावर आता पेरण्या होण्याची शक्यता आहे.