रायगड : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता शेतकऱ्यांनाही जोरदार बसताना दिसतोय. भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तर सावित्री आणि आंबा नद्या सध्या इशारा पातळीवर आहेत.