लातूर जिल्ह्यातल्या उदगीर, अहमदपूर, निलंगा,लातूर तालुक्याच्या ग्रामीण भागात पाऊस झाला आहे. या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. उदगीर शहरातही पाऊस झाला आहे . अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव भागातही पाऊस झाला आहे. पाऊस अचानक आल्याने बाजारपेठेत तारांबळ उडाली.