सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची दमछाक होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सांगलीच्या जत तालुक्यात काल दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.