सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वैभववाडी, फोंडा, करूळसह कणकवली तालुक्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला. दरम्यान हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.