इगतपुरी तालुक्यातील भामनगर, काकुस्ते इथं भर लग्नात पावसाची हजेरी पहायला मिळाली. मंडपात दोन लग्नांची मंगलाष्टकं चालू असताना जोरदार वाऱ्यासह पाऊस आला. अखेर भर पावसातच दोन्ही लग्न उरकली. मात्र लग्नातील पाहुण्यांची एकच तारांबळ उडाली आहे.