कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला आहे, भर पावसात डोंबिवली स्कायवॉकचे छत फाटल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून मुसळधार पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. पावसाचा जोर वाढताच अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.