राहाता-शिर्डीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर कोपरगावात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्ते जलमय होऊन वाहतुकीवर परिणाम झाला. 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची एंट्री केल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अनेकांनी पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेतला.शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून खरीपासाठी अजून दमदार पावसाची गरज आहे.