जळगावच्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव गिरणा परिसरात अखेर सुमारे २५ दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागातही एक ते सव्वा तास पाऊस झाल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.