बीड - बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कालदेखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पाणी पातळीत तापमान वाढल्याने मोठी घट होत होती या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.