सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख या परिसरात पावसाने तुफान बॅटिंग केली. या गावच्या ओढ्याला पूर आला. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असतानाही मुलांना घेऊन नागरिकाने जीवघेणा प्रवास केला. ओढ्याच्या पाण्यातून नागरिक विद्यार्थ्यांना घेऊन मार्ग काढताना दिसून आले. अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अक्कलकोट तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पाणी शिरले. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.