जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. पावसाअभावी कपाशी, मका, सोयाबीन यासह खरीप पिकांवर मोठा परिणाम होत होता.