जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी आता शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. पारंपरिक बैलजोडीच्या साहाय्याने शेतांमध्ये वखरणीची कामे वेगाने सुरू असून खरीप हंगामातील कामांना गती मिळाली आहे.