पुण्यात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. मात्र दुपारनंतर पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. तसेच पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकारही घडले.