चिखली डेपोच्या चिखली ते वाशिम या शिवशाही बसमध्ये थेट पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवशाही बस ही प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.. मात्र, अनेक बस आता जीर्ण अवस्थेत असून त्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येत आहे..