करमाळा शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारावर पावसाचे पाणी साचून त्याला 'तळ्याचे' स्वरूप प्राप्त झाले आहे. महत्त्वाच्या शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत कार्यालयात प्रवेश करावा लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.