2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणी राज ठाकरे ठाणे रेल्वे कोर्टात हजर राहणार आहेत. परप्रांतीय रेल्वे भरतीवरून मनसेनं हे आंदोलन केले होते. यात कल्याण स्थानकावर हिंसाचाराचा आरोप आहे, ज्यामुळे राज ठाकरेंवर परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचार भडकावल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याच प्रकरणी त्यांना अटकही झाली होती.