शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 7 वर्षांनंतर राज ठाकरे पहिल्यांदा मातोश्रीवर आले.