राज ठाकरे यांनी भाजपवर गंभीर टीका केली आहे. भाजपला नरेंद्र मोदी आणि EVMची मस्ती आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपचे सध्याचे यश पत्त्यांच्या बंगल्यासारखे असून, नरेंद्र मोदी हा त्याचा मूळ आधार आहे. मोदींच्या नावावरच भाजपला मतदान मिळत असून, हा पत्त्यांचा बंगला लवकरच कोसळेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.