राज आणि उद्धव ठाकरेंनी भाजप नेते के. अण्णामलाईंच्या मुंबईवरील वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. अण्णामलाईंनी मुंबईला इंटरनॅशनल सिटी म्हटले होते. यावर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया देत, मुंबई महाराष्ट्राचीच असल्याचे ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरेंनी म्हटले की अण्णामलाईंनी भाजपच्या मनातले खरे बोलून दाखवले आहे.