संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली असून, मुंबईसह अनेक शहरांमध्ये ते एकत्र लढणार आहेत. हॉटेल ब्लू सी येथे आज दुपारी १२ वाजता ही घोषणा होणार आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कारावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत सत्य जिंकले, खोटे हरले असे म्हटले.