ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे यांची 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थावर ऐतिहासिक जाहीर सभा होणार आहे. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची ही संयुक्त सभा असेल. आगामी बीएमसी निवडणुका आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.