पुण्याच्या राजगड तालुक्यातील वांगणी गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोरखनाथ भुरूक यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. वेल्हा भागातून काढलेल्या त्यांच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) उमेदवार विजयी होऊन पक्षाला मोठं यश मिळेल असा विश्वास भुरूक यांनी व्यक्त केला.