प्रताप सरनाईकांनी हिंदी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याचा मनसे नेते राजू पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'मराठी आई आणि हिंदी मावशी; हिंदी मावशी नाही पुतणा मावशी. तिने किती भाषा खाल्ल्यात हे त्यांना माहितीये का? हिंदीचा पुळका यांना आहे कारण मराठी माणूस त्यांच्यावर नाराज आहेत" असं म्हणत राजू पाटील यांनी प्रताप सरनाईकांवर टीका केली आहे.