बा पांडुरंगा शक्तीपीठ महामार्गातून आमच्या शेतकऱ्यांना वाचव आणि त्यांची लूट थांबव. महापुराच्या संकटातून कोल्हापूर जिल्ह्याला वाचव असं साकडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पांडुरंगा चरणी घातलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडी नंतर राजू शेट्टी यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या चरणी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी मिळण्याच साकडे घातले.