जळगाव : मुक्ताईनगर येथे प्रचारसभेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. राजकारणाशी देणघेणं नसताना परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं असे यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या. स्वर्गीय निखिल खडसे हे निघून गेल्याने मला आपल्यासमोर यावं लागलं आणि जनतेनेही मला आशीर्वाद दिले, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.