जळगावात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.या रॅलीत समाजबांधवांनी जय संताजी महाराजांच्या जयघोष करीत शहर दुमदुमवले. जुन्या जळगावातील तरूण कुढापा मंडळापासून सुरू झालेल्या या रॅलीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला तसेच समाज बांधवांनी रॅलीमध्ये लक्ष वेधले होते.