वसमत तालुक्यातील प्रसिद्ध सिरळी येथे रामभाऊ महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. समाधी दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक सिरळी गावात दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. महाराजांच्या आशीर्वादासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.