केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात सांगलीमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत. त्यांना सगळया पक्षांनी मदत केली आहे, कोणी वरून, कोणी आतून, असा टोला मंत्री रामदास आठवले यांनी लगावला.