रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्त्वाचे विधान केले आहे. मी ज्यांच्यासोबत राहतो, त्यांना सत्ता मिळतेच, असे ते म्हणाले. काँग्रेससोबत असताना त्यांना सत्ता मिळाली, तर २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेसोबत आल्यानंतरही या युतीला सत्ता मिळाली, असा त्यांचा दावा आहे.