महाराष्ट्रात नाट्यगृहांची दुरावस्था या समस्येच्या सामना दीर्घ काळापासून रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना करावा लागतोय. अनेकदा कलाकारांनी याविषयी उघड भाष्य केले. पण सांस्कृतिक विभागाला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अद्यापही जाग आलेली नाही. अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकाच्या कलाकारांनी पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय अशा रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या दुर्दशेला वाचा फोडलीये.