मनमाडनजीक असलेल्या दरेगावमध्ये कानिफनाथ महाराज यात्रेनिमित्त रंगपंचमीनिमित्त कानिफनाथ महाराज रथोत्सव उत्साहात पार पडला.धुलीवंदनापासून यात्रेला सुरवात होते.ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ह्या जयघोषाने यात्रेला प्रारंभ करतात.रंगपंचमीला रथोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा आहे. नऊ नाथांची वेशभूषा परिधान करत लहान मुले रथात विराजमान असतात.हा रथ ओढण्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बैलजोडीला मान मिळतो.घरोघरी सुवासिनी या रथाचे औक्षण करतात.पारंपारिक संबंळाच्या तालावर रंगांची उधळण करत नाचत आबालवृद्ध रथयात्रेत सहभागी होतात.