रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड शहराची तुलना पाकिस्तानशी केली असून, सत्तारांनी बाहेरील लोकांना आणून शहर भरल्याचा आरोप केला आहे. एका व्यक्तीला २७ हजार मताधिक्य मिळण्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांनाही मतदानाचे महत्त्व पटवून दिले.