पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लेंडेझरी-मोगरकसा संवर्धन क्षेत्रात अलीकडेच दुर्मिळ काळ्या बिबट्यांची जोडी कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. वन्यजीव छायाचित्रकार श्रवण फाये यांनी टिपलेले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहेत. त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. हा काळा बिबट्या जिल्ह्यातील लेंडेझरीजवळील मोगरकसा राखीव जंगलात दिसला असून, हे क्षेत्र नागपूर व भंडाऱ्याच्या सीमेलगत आहे.