भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र पथक पावसाळा ऋतू लागल्या बरोबर सक्रीय झाले आहेत. अनेक विषारी-बिनविषारी साप व जंगली प्राण्यांची सुरक्षित सुटका नागरिकांच्या घरी जाऊन व शेतातून करीत आहेत व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करीत आहेत. यातच केसलवाडा रोडवरील एम.डी.एन फ्युचर स्कूल येथे स्वच्छतागृहात साप असल्याची माहिती सरीसृप यांना मिळाली.ते तात्काळ घटनास्थळी साप रेस्क्यू करायला गेले असता त्यांना दुर्मिळ प्रकारचा फॉस्टेन कॅट स्नेक आढळला त्यांनी रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले आहे.फॉस्टेन कॅट स्नेक हा साप प्रथम जिल्हात आढळून आला आहे.