नाशिक : रामसर दर्जा प्राप्त नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य येथे तब्बल २२ वर्षांनंतर दुर्मिळ ग्रेट व्हाईट पेलिकन पक्ष्याचे आगमन झाले आहे. वन्यजीव विभागाकडून तशी अधिकृत नोंद करण्यात आली आहे. युरोप-मध्य आशियातून स्थलांतरित होणारा हा दुर्मिळ पक्षी आहे. तो आता परतीच्या प्रवासात असून त्याने या अभयारण्यात मुक्काम केला आहे.