रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरालगतच्या परिसरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक निसर्गप्रेमीने या दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी या दुर्मिळ मुंगसाच्या अस्तित्वाला दुजोरा देत, त्याचे नेमके ठिकाण कोणत्याही परिस्थितीत जाहीर करू नये, असे आवाहन केले आहे.