ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू आमने-सामने आले. दोघांनी ही एकमेकांवर नजर कटाक्ष टाकत बोलणे टाळले. चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंच्या शिवसेना पक्षप्रवेशासह महानगरपालिकेच्या उमेदवारीला ही विरोध केला होता. तर पालकमंत्री संजय शिरसाठ त्यांच्या कन्या नगरसेविका हर्षदा शिरसाठ व चंद्रकांत खैरे यांच्यात गप्पा रंगल्या. हर्षदा शिरसाठ यांनी चंद्रकांत खैरे यांचे आशीर्वाद घेतले.