लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऊसाला प्रति क्विंटल चार हजार दोनशे भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीची आहे. अनेक पक्ष संघटनांनी एकत्र येत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. पानगाव येथील पनगेश्वर शुगर मिल समोर पानगाव रेणापूर रस्ता अडवत हे आंदोलन करण्यात आले. ऊसाला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा ही मागणी प्रामुख्याने आंदोलनात मांडण्यात आली.